*कोकण Express*
*भारतीय संविधान उद्देशिकेमधून साकारली बाबासाहेबांची प्रतिमा*
*कासार्डे : संजय भोसले*
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची गुरुवार दि.14 एप्रिल, 2022 रोजी जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी आंबेडकरांचे अनोखे चित्र रेखाटले आहे. भारताच्या संविधान उद्देशिकेतून बाबासाहेबांची अप्रतिम कलाकृती त्यांनी साकारली आहे. या चित्रात भारतीय संविधानाची उद्देशिका सुंदर पध्दतीने लिहली आहे. वेगळया शैलीचे हे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त गेली काही वर्षे डाॅ.डाकवे त्यांची चित्रे रेखाटत आहेत. यापूर्वी त्यांनी स्केच, शब्दचित्र, पोट्रेट, रांगोळी इ. माध्यमात आंबेडकरांची चित्रे तयार केली आहेत. नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांच्या नावाची नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड, इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकांत झाली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांचे कलेतील 5 रेकाॅर्ड :
जास्तीत जास्त मान्यवरांना चित्रे भेट
83 चित्रांचे प्रदर्शन
54 चित्रांची फ्रेम भेट
कोरोना काळात अनोखा कलात्मक उपक्रम
81 कॅलिग्राफी पोस्टकार्ड पाठवून शुभेच्छा