*कोकण Express*
*बेळणे येथे वृध्दाश्रमाचा 15 ला भूमिपूजन : अक्षरोत्सव प्रदर्शनाचे आयोजन*
*कासार्डे ः संजय भोसले*
बेळणे येथे भांडुप येथील विजय क्रिडा मंडळाकडून नियोजित वृध्दाश्रमाचा भूमिपूजन आणि नुतन गणेश मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना 15 एप्रिलला करण्यात येणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून या संपुर्ण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भांडुप येथील नामांकीत विजय क्रिडा मंडळाने बेळणे येथे निराधार वयोवृध्द नागरिकांस विनामूल्य सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून वृध्दाश्रमाची संकल्पना मांडली. त्याला मुर्त रुप येण्यासाठी नियोजित वृध्दाश्रमाचा भूमिपूजन सोहळा तसेच नुतन गणेश मन्दिरात श्री गणरायाची प्राण प्रतिष्ठापना 15 एप्रिलला सकाळी 8 वा. करण्यात येणार आहे. यावेळी या मंड़ळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या “अक्षरोत्सव” संग्रहाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी 9.30 वा. होईल. यावेळी देश परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकीत व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.
या सर्व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विजय क्रिडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.