भाजपा वेंगुर्ले च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

*कोकण Express*

*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त भाजपा तालुका कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतीमेस नगराध्यक्ष राजन गीरप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले की भाजपा सरकारच्या काळात आंबेडकर स्मारकाच्या कामाचा शुभारंभ

इंदु मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारणीच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात झाला .
तसेच देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि दुर्बल वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक निर्णय घेतले .त्यांच्या शैक्षणिक , सामाजिक व आर्थिक असा सर्वांगीण विकास करुन जीवनमान ऊंचवण्याचा प्रयत्न केला .
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या काळात अनुसूचित जातींच्या मुलींची नवीन ५० वसतिगृहे , तसेच काम करणारया महीलांकरीता मुंबई ,पुणे व नागपूर येथे तीन वसतिगृहे , तसेच डाॅ. बाबासाहेब यांच्या पद्स्पर्शाने पवित्र झालेल्या ५० ऐतिहासिक स्थळांचा विकास केला . तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापना केली .
तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन येथे शिक्षण घेत असताना वास्तव्यात असलेले घर शासनाने विकत घेऊन त्यांचे स्मारकात रुपांतर केले . तसेच संत रोहिदास भवन – परेल , मुंबई चे बांधकाम , नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस व दिक्षा भुमी , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी स्व. वसंतराव गोडबोले यांच्या चिंचोली येथील जागेवर बाबासाहेबांच्या वैयक्तिक वापरातील वस्तुंचे जतन , संरक्षण व संवर्धन , वास्तुसंग्रालयाचे आधुनिकीकरण व परीसर सुशोभिकरण , तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर यासाठीही भरगोस निधीची तरतूद तात्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने केली .
तसेच चैत्यभुमी व दिक्षाभुमीला ” अ ” वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला . तसेच जपान मधील कोयासन विद्यापीठात महामानवाच्या पुतळ्याचे अनावरण केले .
अशा पद्धतीने भाजपा सरकारच्या काळात महामानवाच्या यथोचित सन्मान झाला .
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , नगराध्यक्ष राजन गीरप , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल – बाळा सावंत , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे – नागेश उर्फ पींटू गावडे – धर्मराज कांबळी , नगरसेविका श्रेया मयेकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , अनुसूचित जाती मोर्चाचे आर.के.जाधव , शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर , महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर – रसीका मठकर , अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार , प्रभारी ज्ञानेश्वर केळजी , सई चेंदवनकर व वासुदेव पांगम इत्यादी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!