*आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मालवण तालुक्यातील ५ ग्रामपंचातींच्या इमारत बांधकामास मंजुरी*

*आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मालवण तालुक्यातील ५ ग्रामपंचातींच्या इमारत बांधकामास मंजुरी*

*कोकण Express*

*आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मालवण तालुक्यातील ५ ग्रामपंचातींच्या इमारत बांधकामास मंजुरी*

*देऊळवाडा, पळसंब, चौके, नानेली, निरूखे ग्रा. प. ना मिळणार नवीन इमारत*

*मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेत समावेश*

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत ज्या ग्रामपंचातींना स्वतःच्या कार्यालयासाठी स्वतंत्र ईमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतःचे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे.आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मालवण तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असून मालवण तालुक्यातील देऊळवाडा, पळसंब, चौके तर कुडाळ तालुक्यातील नानेली, निरूखे या ग्रामपंचातींच्या इमारत बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे.

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करून सदर ग्रामपंचातींच्या इमारत बांधकामास मंजुरी घेतली आहे. याबाबतचा शासन निर्णय क्र. (ग्रापंई-२०२०/प्र.क्र.४४/बांधकाम-४) दि. ३१ मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!