*कोकण Express*
*सावंतवाडी मतदारसंघातील रस्ते डांबरीकरण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी गाववार रस्ते विकास खडीकरण डांबरीकरण यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सुमारे 99 विविध विकास कामांना पंचवीस पंधरा या अंतर्गत मंजुरी मिळाली असून पाच कोटी रुपयांचा निधी यासाठी खर्च करण्यात येणार आहे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यातील विविध रस्ते या निधीतून पूर्णत्वास येणार असून खडीकरण डांबरीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे अतिवृष्टी आणि कोरोना काळामध्ये विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते खड्डेमय झाले होते त्या रस्त्यांची दुरुस्ती खडीकरण आणि डांबरीकरणाचे केले जाणार असल्याचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी सांगितले.
सावंतवाडी तालुक्यातील विविध रस्ते खडीकरण डांबरीकरणाच्या कामांमध्ये सांगेली सनमटेब सभामंडप विस्तारीकरण करणे आंबोली मुख्य रस्ता ते नांगरतासवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे तळवडे परबवाडी शाळा नं. ६ जवळील रस्त्यास पुलास संरक्षक भिंत बांधणे निरवडे सावंतवाडी वेंगुर्ला मुख्य रस्ता ते निलेश शिरोडकर घर ते नाडकर्णी घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे माजगांव कासारवाडी सांगवेकर घर ते मंगेश कासार घरापर्यंत रस्त्यास गटार बांधणे नाणोस मुख्य रस्त्यापासून गंगाराम जोशी यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला संरक्षक भिंत बांधणे सातार्डा काराखाणी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ता. सावंतवाडी आंबेगांव सटवाडी ते लक्ष्मण काळे ते बाबु वरक यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे वेर्ले मुख्य रस्ता ते हरिजनवाडी रस्ता मजबुतीकरण करणे वेत्ये खांबलवाडी हायवे ब्राम्हणदेव ते सटपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे नेमळे कळगुटकरवाडी ते भाई भोगले याच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे दांडेली चांभारवाडी ते वरचावाडा रस्ता मजबुतीकरण करणे पाडलोस मुख्य रस्ता ते माडाचे गाळू रस्ता मजबुतीकरण करणे विलवडे धनगरवाडी रस्ता ते गणपती विसर्जन स्थळाकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे .
कुणकेरी आयनाचे गाळू धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ता. सावंतवाडी सातोळी लक्ष्मण माळकर घराजवळ विंधन विहीर मारणे तिरोडा मनोहर मयेकर घरापासून ते दत्तमंदिर पर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे गुळदुवे विरेश्वर मंदिर ते सदानंद मठाकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ता. सावंतवाडी आंबोली हिरण्यकेशी मुख्यरस्ता ते परमपुज्य भारतदास महाराज मठाकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबूतीकरण करणे. डेगवे वरची फणसवाडी मार्गे आंबेखण रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे शिरशिंगे शिवापूर मुख्य रस्ता ते स्मशानभुमी मार्गे उत्तम पेडवेकर घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे किनळे मुख्य रस्ता ते भटवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ता. सावंतवाडी मळेवाड हेदूळवाडी श्री गजानन महाराज मंदिरजवळ सौरउर्जा हायमास्ट बसवणे मळगांव गोसावी आजगांवकरवाडी ते गवंडेवाडी नाना भटजी घर रस्त्यावर पूल बांधणे सांगेली मुख्य रस्ता ते माडखोल शाळा नं. १ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निगुडे मुख्य रस्ता ते गावठणवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे असनिये मुख्य रस्ता ते दुसंगवाडी पर्यंत रस्ता तयार करणे ता. सावंतवाडी कलंबिस्त दलीत वस्तीकडे जाणारा रस्ता मजबूतीकरण करणे, अशा कामांचा समावेश आहे केव्हा रस्ते खडीकरण डांबरीकरण नव्हेतर विविध विकास कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती रुपेश राऊळ यांनी दिली