*कोकण Express*
*आम.नितेश राणे यांनी नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथे नुकसानीची केली पाहणी*
कणकवली तालुक्यातील नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथे नुकत्याच झालेल्या अवकाळी वादळी पावसाने घरांवर झाडे कोसळून घरांचे नुकसान झाले.याबाबत आम.नितेश राणे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली व संबंधीत अधिकाऱ्यांशी जागेवर चर्चा करून नुकसानग्रस्त लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचना केल्या,
यावेळी सोबत माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष संतोष कानडे व मिलिंद मेस्त्री, शक्तिकेंद्र प्रमुख भाई मोरजकर,पंचायत समिती सदस्या सौ. हर्षदा वाळके,नांदगाव सरपंच श्रीमती अफरोजा नावलेकर, कृषी सेवक निलेश कावले, ग्रामसेवक श्री. हरमलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.