*कोकण Express*
*शिवडाव सोसायटी निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील शिवडाव सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी जि. प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक किरण गावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत श्री देव लिंगेश्वर ग्रामसेवा पॅनल ने शिवसेना पॅनेल चा सुफडा साफ करत सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळवला आहे.उद्योजक किरण गावकर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपा उमेदवारांनी ऐतिहासिक विजय मिळवीत शिवडाव सोसायटी निवडणुकीत इतिहास रचला आहे.
शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य बाळा भिसे यांचे आव्हान संपुष्टात आणत किरण गावकर यांनी एकहाती विजय मिळवून दाखवला आहे. आज झालेल्या मतमोजणीनंतर भाजपा पुरस्कृत पॅनल चे पुढील १३ उमेदवार निवडून आले. किरण गावकर, दिलीप गावकर, मिलिंद गावकर, तुकाराम पवार, लवू वाळके, अशोक जाधव, प्रियांका सावंत , सुरेश बोडेकर, बाळकृष्ण मेस्त्री, धोंडी पाताडे, रविकांत सावंत, बाळकृष्ण गुरव, स्नेहलता पाताडे. सर्व विजयी उमेदवारांचे माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत यांनी अभिनंदन केले.