वाघेरी सोसायटी निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत शेतकरी उत्कर्ष पॅनलचा एकतर्फी विजय

वाघेरी सोसायटी निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत शेतकरी उत्कर्ष पॅनलचा एकतर्फी विजय

*कोकण Express*

*वाघेरी सोसायटी निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत शेतकरी उत्कर्ष पॅनलचा एकतर्फी विजय*

*पं.स विभागातील तीन पैकी दोन सोसायटीवर एकतर्फी विजय *

*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*

रामनवमी मुहूर्तावर काल झालेल्या झालेल्या कणकवली तालुक्यातील वाघेरी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत शेतकरी उत्कर्ष आघाडी पॅनल ने भाजपा पुस्कृत सहकार समृद्धी पॅनल चा दारुण पराभव करत १२ पैकी तब्बल ११ उमेदवार शिवसेना पुरस्कृत शेतकरी उत्कर्ष पॅनल चे निवडून आणत एकतर्फी विजय मिळविला.माजी सभापती मनोज रावराणे आणि  वाघेरी सरपंच संतोष राणे यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केलेले असतानाही जि प सदस्य संजय आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली युवा विभागप्रमुख सिद्देश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा एकतर्फी विजयश्री खेचून आणला आहे.
वाघेरी विकास सेवा सोसायटी निवडणुकीमध्ये मध्ये शिवसेना पुरस्कृत शेतकरी उत्कर्ष आघाडी पॅनल चे विजयी उमेदवार मुरलीधर रमाकांत राणे १०९ मते,अनंत काशीनाथ राणे १०७ मते,मकरंद अशोक राणे १०१ मते,विश्राम परशुराम राणे ९८ मते,श्रीकांत चंद्रकांत राणे ९८ मते,संतोष बाळकृष्ण कदम ९४ मते, सहदेव विश्राम मोडकर ९४ मते,तुकाराम गुरव ९५ मते,गोपाळ कदम १०२ मते,सुहासिनी राणे १०९ मते,स्नेहलता नेवगे यांनी ९४ मते मिळवत विजय संपादन केला.तर भाजपा पुस्कृत सहकार समृद्धी पॅनल चे संतोष राणे  या एकमेव उमेदवाराने ९० मते मिळवत विजय संपादन केला.
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या घोणसरी आणि वाघेरी  विकास सेवा सोसायटीतील निवडणुकांमध्ये शिवसेनेने मिळविलेला एकतर्फी विजय म्हणजे आगामी होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद च्या निवडणूका साठी भाजपा करीता ही धोक्याची घंटा मानली जात असून या पंचायत समिती विभागातून नेतृत्व करणाऱ्या माजी सभापती मनोज रावराणे यांच्या नेतृत्व अस्तित्वाचा कस पुढील निवडणुकांमध्ये लागणार आहे.
वाघेरी विकास सेवा सोसायटीवर एकतर्फी भगवा झेंडा फडकल्याचे वृत्त समजताच शिवसेना नेते सतीश सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, जि प सदस्य संजय आंग्रे,शिवसेना तालुका प्रमुख शैलेश भोगले,माजी जि प कृषी सभापती संदेश पटेल आदींनी विजयी उमेदवाराची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि वाघेरी विकास सोसायटीचे नूतन संचालक म्हणून शुभेच्छा ही दिल्या यावेळी उपतालुकाप्रमुख प्रकाश वाघेरकर,विभाग प्रमुख बाबू रावराणे,राजू रावराणे,बबन नारकर,संजय पारकर,युवा सेना शाखाप्रमुख अमोल गुरव,शाखा प्रमुख दत्तात्रय राणे,दिनेश राणे ,सुनील राणे,मंगेश नेवगे,एकनाथ वाघेरकर,राजेश कदम ,किर्तीकुमार पाटील, मुरारी राणे,का.वा. राणे,निलेश भोगले केदार रेवडेकर,दिलीप कदम,गजानन राणे,उपसरपंच अनुजा राणे,आत्माराम राणे,दत्ता राणे,विणेश राणे,मनोहर कदम,दिनेश पेडणेकर,सिद्देश मोडकर,दीपक कदम,एकनाथ राणे,नितीन कदम,संजय कदम,प्रकाश सुतार आदी शिवसेना विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!