*कोकण Express*
*आमदार नितेश राणेंच्या शुभेच्छा तेजस राऊत यांना भोवल्या*
*युवा सेना विभागप्रमुखपदावरून केली गच्छंती; युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली नियुक्ती जाहीर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
युवा सेनेचे खारेपाटण विभाग प्रमुख तेजस राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार नितेश राणे यांनी नुकतीच त्यांच्या घरी भेट देत त्यांचा सत्कार केला होता. युवासेना विभाग प्रमुख तेजस राऊत यांच्या घरी आमदार नितेश राणे यांनी दिलेली भेट व केलेला सत्कार हा तेजस राऊत यांना भोवला असून, तेजस राऊत यांची विभागप्रमुख या पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. तेजस राऊत यांनी मी शिवसैनिक असल्याचेही स्पष्टीकरण दिले होते. तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तातडीने खांदेपालट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी मंगळवारी तातडीने खारेपाटण येथे धाव घेत बैठक घेऊन युवासेनेच्या विभागप्रमुख पदी संकेत लोकरे यांची नियुक्ती जाहीर केली आहे. तर तेजस राऊत यांची विभाग प्रमुख पदावरून गच्छंती करत असतानाच त्यांना उपतालुकासंघटक या पदावर स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तेजस राऊत यांचे आमदार नितेश राणे यांनी केलेले कौतुक हे त्यांच्या अंगाशी आल्याचे दिसून येत आहे. या बैठकीवेळी महिला उपजिल्हासंघटक मिनल तळगावकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख गोट्या कोळसुलकर, उपविभागप्रमुख दया कुडतरकर, सुनिल बांदिवडेकर, शाखाप्रमुख भूषण शेलार, युवासेना शाखाप्रमुख मंदार पवार, भूषण कोळसुलकर, बबन मुणगेकर, अभिषेक जाधव, विनय पगारे, वैभव कांबळे, योगेश मुद्राळे, प्रज्योत मोहिरे, प्रणय उपाध्ये, प्रकाश नानिवडेकर, सुनिल कर्ले, गिरीश पाटणकर, प्रसाद भडाळे, आदेश उपांडकर, संतोष गाठे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.