तिर्लोट वि.का.स. सेवा सोसायटीच्या विजयाचे शिल्पकार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आरीफभाई बगदादी

तिर्लोट वि.का.स. सेवा सोसायटीच्या विजयाचे शिल्पकार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आरीफभाई बगदादी

*कोकण Express*

*तिर्लोट वि.का.स. सेवा सोसायटीच्या विजयाचे शिल्पकार भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव आरीफभाई बगदादी*

*देवगड ः प्रतिनिधी*

तिर्लोट विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या आज पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने सोसायटीवर निर्विवाद विजय मिळवला आहे. जिल्हा सचिव सन्मा. आरिफभाई बगदादी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तिर्लोट गावचे जेष्ठ नेते तथा माजी चेअरमन श्री. रमाकांत घाडी यांच्या नेतृत्वाखाली सदरची निवडणूक लढविण्यात आली होती. विरोधी पक्षाने हि निवडणूक प्रतिष्ठेची करून अनेक पदाधिकारी प्रचारासाठी मैदानात उतरवले होते. मात्र आरिफभाई बगदादी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असणाऱ्या तिर्लोट गावातील मतदारांनी आपला हक्क बजावत भारतीय जनता पक्षाच्या पॅनल ला विजय मिळवून दिला.
सन्मा. आरिफभाई बगदादी यांनी आज सायंकाळी तिर्लोट येथे जाऊन विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यांच्या समवेत तिर्लोट गावचे सरपंच श्री. राजन गिरकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री. पद्माकर घाडी, पडेल येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव वारीक तसेच ठाकूरवाडी सरपंच श्री. वलीद ठाकूर तसेच गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!