नवचेतना महिला उद्योग ओझरमच्या ४५ महीलांनी घेतला पॅकींग प्रशिक्षणाचा लाभ

नवचेतना महिला उद्योग ओझरमच्या ४५ महीलांनी घेतला पॅकींग प्रशिक्षणाचा लाभ

*कोकण  Express*

*नवचेतना महिला उद्योग ओझरमच्या ४५ महीलांनी घेतला पॅकींग प्रशिक्षणाचा लाभ*

*कासार्डे ः  संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील अगदी निसर्गाच्या कुशीत असलेल्या ओझरम गावात नवचेतना महिला उद्योगा मार्फत राबवित असलेल्या शिका व कमवा या घर बसल्या पॅकिंग च्या कामासाठी आवश्यक प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला . यासाठी ओझरम गावातील तब्बल 45 महिलांनी अर्ज केले होते. त्यांना कामासाठी आवश्‍यक प्रशिक्षण देऊन काम देण्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे .
प्रशिक्षणादरम्यान महिलांना पॅकिंग च्या कामासाठी आवश्यक मशीन साहित्य वाटपही करण्यात आले. प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसाचा असून त्यानंतर महिलांना प्रत्यक्ष काम दिले जाणार आहे. यावेळी नवचेतना महिला उद्योगाच्या संस्थापिका सिया गावडे या म्हणाल्या की “ओझरम गावात प्रशिक्षण व कामाची सुरुवात केली आहे” अशाच अजून सव्वीस वेगवेगळ्या गावातील महिलांनी कामाची मागणी केलेली आहे. त्यांनाही प्रशिक्षण व काम दिले जाईल.
यावेळी महिलांनी त्यांना दिलेल्या मशीनची विधीवत पूजा करून त्यावर पॅकिंग चा सराव करण्यास सुरुवात केली. व उत्साहाने प्रशिक्षणात सहभाग घेतला. उपस्थित महिला म्हणाल्या ,”अशा संस्थेची आम्ही वाटच पहात होतो”. महिला उद्योगामुळे आम्हाला ही संधी मिळाली आहे. नक्कीच आमच्या सर्वांच्या जीवनात आणि संसारात यामुळे हातभार लागेल अशी आशा आहे. आमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केलेल्या नवचेतना उद्योग समूहाच्या संस्थापिका सिया गावडे यांचे आम्ही विशेष आभार मानतो. व अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प आमच्या महिला वर्गासाठी त्यांनी घेऊन यावेत अशी विनंती ही सिया गावडे यांना महिलांच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!