*कोकण Express*
*प्राथ. आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उत्तम सेवा मिळावी:संजना सावंत*
*प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कनेडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सिंधुदुर्ग जि. प.अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत ,वैद्यकीय अधिकारी अजित फाटक,डाॅ.नीता बाड,तालुका आरोग्य अधिकारी संजय पोळ ,तालुका आरोग्य सहाय्यक विनोद सावंत,नेत्र चिकित्सक अधिकारी कोरे, आरोग्य सहाय्यक विलास पवार, अजित चव्हाण,सर्व उपकेंद्राचे आरोग्य सेवक , सेवीका , फार्मासीस्ट,सर्व कर्मचारी वृंद,सुरेश ढवळ ,सांगवे सरपंच मयुरी मुंज, विभागातील सर्व सरपंच ,उपसरपंच,पदाधिकारी , कार्यकर्ते,व ग्रामस्थ उपस्थित होते.
या इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे झालेले आहे या बद्दल समाधान व्यक्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णांची तपासणी करून उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जातील.सर्व डाॅ .सर्व आरोग्य कर्मचारी वर्ग हे चांगले काम करत आहेत याबद्दल सुद्धा सौ.संजना सावंत यांनी समाधान व्यक्त केले.या इमारतीच्या बांधकामा साठी जिल्हा नियोजन मधुन ९९लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.