*कोकण Express*
*जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत फोंडाघाट पंचक्रोशी संघ विजेता*
*निलेश राणेंच्या वाढदिवसा निमित्त कुडाळात आयोजन; पारितोषिक वितरण संपन्न…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने कुडाळ येथे आयोजित.जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत फोंडाघाट पंचक्रोशी संघ विजेताा झाला. तर द्वितीय वालावल लक्ष्मी नारायण संघ, तृतीय सावंतवाडी जय महाराष्ट्र व चतुर्थ कोळशी सिंधू पुत्र संघ आदींनी यश संपादन केले. दरम्यान विजेत्यांना चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, उद्योजक विशाल परब, जिल्हा बँक संचालक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, समाज कल्याण सभापती व मागासवर्गीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश जाधव, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, विवेक मांडकुलकर, शहर अध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक विलास कुडाळकर, अभी गावडे, राजीव कुडाळकर, निलेश परब, प्राजक्त बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना श्री. राणे म्हणाले, मला साथ देणारे माझे मित्र मिळाले आणि ते देवाच्या कृपेने चांगले मिळाले, विशाल परब हा आपला कधीही वाढदिवस साजरा करत नाही, पण माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. त्याने जी कबड्डी स्पर्धा आयोजित केली आहे, याकडे फक्त मनोरंजनात्मक बघू नका, तर या खेळा मधून आपण कसे घडू शकतो, याकडे लक्ष द्या, तसेच रोजगारही तेवढाच महत्त्वाचा आहे. मनोरंजनाबरोबर आपल्या पोटापाण्याचे सुद्धा बघितले पाहिजे त्यासाठी नोकरी व्यवसाय सुरू करा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू आकाश पाटील (फोंडाघाट पंचक्रोशी) उत्कृष्ट चढाई गिरीश चव्हाण (वालावल लक्ष्मी नारायण) उत्कृष्ट पकड गुरु पाटकर (वालावल लक्ष्मी नारायण संघ) आदींना इतर पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.