कासार्डेत होळीचा नवा ट्रेंड प्लॅस्टिक कचरा गोळा करून साजरी केली होळी

कासार्डेत होळीचा नवा ट्रेंड प्लॅस्टिक कचरा गोळा करून साजरी केली होळी

*कोकण Express*

*कासार्डेत होळीचा नवा ट्रेंड प्लॅस्टिक कचरा गोळा करून साजरी केली होळी!*

*सिंधुदुर्गातील कासार्डे आनंदनगरमधील महिलांची पर्यावरणपुरक आणि स्वच्छतेचा संदेश देणारी आदर्श होळी!*

*कासार्डे   ः संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील कासार्डे आनंदनगर मधील महिलांनी एकत्र येत होळीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवून समाजाला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कासार्डे आनंदनगरमधील माळरानावर पसरलेला प्लॅस्टिक कचरा, असंख्य काचेच्या बाटल्या व इतर कचरा जमा करीत स्वच्छता मोहीम राबवले.प्रथम काचेच्या बाटल्यांची योग्य ती विल्हेवाट लावत उर्वरित प्लॅस्टिक कचरा एकत्र करून त्याची या महिलांनी होळी केली करून वृक्षतोड करु नका, प्लॅस्टिक पर्यावरणाला कसे हानिकारक आहे हे पटवून देण्यासाठी आपल्या पारंपरिक होळी सणाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक आणि स्वच्छतेचा संदेश देणारी अनोखी पद्धतीने होळी साजरी केली आहे.

होळी रे! होळी कच-याची होळी!
आमचं आनंदनगर! स्वच्छ आणि सुंदर आनंदनगर! अशा घोषनानी आसमंत दुमदुमला .
या उपक्रमांमध्ये कासार्डे आनंदनगरमधील बहुसंख्य महिला, युवती आणि बालगोपाळही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या नव्या ट्रेंडचे मात्र सर्व दशक्रोशीत कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!