*कोकण Express*
*हळवल ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला अखेर यश*
*मुख्य रस्ता नूतनीकरणचा झाला शुभारंभ; ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्हा वार्षिक योजना (जनसुविधा) सन २०२०-२१ अंतर्गत हळवल शिवडाव मुख्य रस्ता ते हळवल परबवाडी जाणारा अंतर्गत रस्त्याचा शुभारंभ जिल्हाबँक संचालक तथा कणकवली नगरसेवक सुशांत नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
हळवल ते शिवडाव जाणाऱ्या मार्गावरून हळवल परबवाडी येथील पोट रस्ता खराब झाला होता या मार्गाचे नूतनीकरण व्हावे यासाठी अनेक वर्षे ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार या रस्त्याला मंजुरी देण्यात आली सुमारे ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी उपतालुकाप्रमुख राजू राणे, युवा विभागप्रमुख रोहित राणे, उपसरपंच अरुण राऊळ, भास्कर राणे, मारुती सावंत, नामदेव परब, रवी परब, माजी सरपंच स्मिता परब, लवू परब, गोविंद यशवंत परब, जनार्दन डोबकर, गणेश राणे, सुभाष परब, संतोष म्हाडेश्वर(सामाजिक कार्यकर्ते), गणपत परब, रामचंद्र परब, वामन परब, दिनेश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश परब, गोविंद आप्पा परब दिनेश चव्हाण, मंगेश ठाकूर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेक वर्षे मागणी होत असलेला मार्ग अखेर सुकर होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे