*कोकण Express*
*युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते होळी चषक क्रिक्रेट स्पर्धेचे उदघाटन*
*रोहित रावराणे पुरस्कृत युवा सेना वैभववाडी आयोजित होळी चषक क्रिक्रेट स्पर्धा*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
रोहित रवींद्र रावराणे पुरस्कृत युवा सेना वैभववाडी आयोजित होळी चषक 2022 क्रिक्रेट स्पर्धेचे उदघाटन युवा सेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांच्या हस्ते शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके,माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, रवींद्र उर्फ बाबू रावराणे, रोहित रावराणे आदी उपस्थित होते.
कोकिसरे बांधवाडी येथील मैदानावर 17 मार्च ते 19 मार्च दरम्यान चालणाऱ्या 3 दिवसीय होळी चषक या भव्य क्रिक्रेट स्पर्धेत दिग्गज क्रिक्रेट संघ सहभागी झाले आहेत.कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. युवासैनिक रोहित रावराणे यांच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या या होळी चषक क्रिक्रेट स्पर्धेतून स्थानिक खेळाडूंच्या क्रीडाकौशल्याला वाव मिळणार आहे. पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात रोहित रावराणे यांच्या माध्यमातून कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचा भगवा झंझावात सुरू राहील असा विश्वास यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केला. शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते छञपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. होळी चषक 2022 क्रिक्रेट स्पर्धेतील अंतिम विजेत्याला रोख रु 15 हजारव आकर्षक चषक देण्यात येणार आहे. उपविजेत्याला रोख रु. 10 हजार व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.