*कोकण Express*
*भाजपा प्रदेश चिटनीस व मा.खासदार निलेशजी राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ६४ इ – श्रम कार्ड चे वाटप*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने प्रदेश चिटनीस व मा. खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील ६४ पुरुष व महिलांना मोफत ई – श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले .
तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सुरवातीला निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या . तसेच त्यांच्या हातून जनतेची सेवा होण्यासाठी लवकरात लवकर आमदार होवोत अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली .
यावेळी नगराध्यक्ष राजन गिरप , जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल – बाळा सावंत , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे , नगरसेविका श्रेया मयेकर – कृपा मोंडकर – पुनम जाधव , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.चिटनीस नितिन चव्हाण , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , महिला जि. सरचिटणीस सारीका काळसेकर , शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर – जगंन्नाथ राणे , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , बुथप्रमुख शेखर काणेकर व नितीश कुडतरकर व वामन गावडे , युवा मोर्चा चे भुषण सारंग , विभागीय अध्यक्ष अमित गावडे , अनु.जाती मोर्चा चे गुरुप्रसाद चव्हाण , वजराठ उपसरपंच नितीन परब , महिला मोर्चा च्या व्रुंदा मोर्डेकर – रसीका मठकर – आकांक्षा परब , ज्ञानेश्वर केळजी तसेच तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते .