*कोकण Express*
*तिथी नूसार साजरी होणार्या शिव जयंती निमित्त कासार्डे तिठ्ठा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन*
*कासार्डे ः संजय भोसले*
राजा छत्रपती ग्रुप व नवतरूण उत्कर्ष मंडळ, कासार्डे (रजि.) आयोजित शिवजयंती (तिथीनुसार) रविवार दि.२० मार्च २०२२ व सोमवार दि.२१ मार्च २०२२ रोजी कासार्डे तिठ्ठा येथे साजरी होणार आहे.
यानिमित्त रविवार दि. २० मार्च २०२०
सकाळी ८:०० कासार्डे तिठ्ठा-तळेरे- कासार्डे तिठ्ठा-विजयदुर्ग किल्ला- कासार्डे अशा मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ होत रॅली काढण्यात येणार आहे.तर सोमवार दि.२१ मार्च २०२२
सकाळी ९ वा. दीपप्रज्वलन, छत्रपतींची प्रतिष्ठना,पूजन व मान्यवरांचे स्वागत सकाळी ९:३० वा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगाचे सादरीकरण स्पर्धा( सहभाग – कासार्डे केंद्रातील जि.प.प्राथमिक शाळा)
सकाळी १०:३० वा स्विटलॅंड इंग्लिश मिडीयम स्कूल,तळेरे याचे मर्दानी खेळ सकाळी ११:०० वा मान्यवर,समाजिक, क्रिडा कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व विद्यार्थी सत्कार व बक्षिस वितरण समारंभ व सायंकाळी ४ वा.
बुवा विजय उर्फ गुंडू सावंत,
वर्दे, कुडाळ विरूद्ध बुवा संदीप लोके
लिंगडाळ, देवगड याचा डबलबारी भजनांचा जंगी सामना होणार आहे.तरी दशक्रोशीतील तमाम शिवप्रेमीनी उपस्थित राहावे.असे आवाहन राजा शिवछत्रपती ग्रुप व नवतरूण उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी, यानी केले आहे.