*कोकण Express*
*बेकायदा वाळू उपसावर कारवाई न केल्यास तेरेखोल नदीपात्रात जलसमाधी घेणार; सातोसे ग्रामस्थांचा इशारा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यातील तेरेखोल नदीपात्रातून गोवा तेरसे येथील वाळू व्यवसायिकाकडून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून, त्याचा परिणाम सातोसे गावातील शेतीवर होत असून, शेत जमीन नदीत वाहत जात तेरेखोल नदीचे पात्र बदलत आहे. असा आरोप त्या गावातील ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी शासनाने यावर लक्ष देऊन कारवाई न केल्यास संपूर्ण गाव तेरेखोल नदीत जलसमाधी घेईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, रात्री अपरात्री नदीपात्रात येऊन वाळू उपसा होत असून, ग्रामस्थांनी याबाबत जाब विचारल्यास त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. या वाळू उपश्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असून, अंदाजे ३ ते ४ किलोमिटर परिसर नदीपात्रात वाहून गेली आहे. यावर शासनाने लक्ष घालून आम्हला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी रवींद्र सावंत, कृष्णा कळगुटकर, विलास सावंत, अर्जुन रेडकर, शिवराम पंडित आदी ग्रामस्थ उपस्थित होते.