देवगड चोरीप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग पोलिसांना निवेदन

देवगड चोरीप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग पोलिसांना निवेदन

*कोकण  Express*

*देवगड चोरीप्रकरणी आमदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग पोलिसांना निवेदन*

*देवगड ःःप्रतिनिधी* 

देवगड-जामसंडे शहरामध्ये घरफोड्या व दुकानफोड्या चोऱ्यांचे प्रमाण गेल्या महीन्याभरापासून जास्त प्रमाणात वाढले असून, त्यामुळे सर्व सामान्य नागरीक व व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. याबाबत स्थानिक जनतेच्या भावना तीव्र स्वरूपाच्या असून वेळीच याला आळा न घातल्यास ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तरी याबाबत बंदोबस्त वाढवून त्वरीत कार्यवाही व्हावी याबाबतची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या जवळ आमदार नितेश राणे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!