*कोकण Express*
*कणकवली तालुक्यात दोन दिवसात २० लेप्टो पॉझिटिव्ह*
*आतापर्यंत ३८ लेप्टो पॉझिटिव्ह; जोखीम ग्रस्त गावांमध्ये गोळ्यांचे वाटप सुरु..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यात सध्या लेप्टो पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल वीस लेप्टो पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत कणकवली तालुक्यात लेप्टो ३८ रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहेत.जोखीम ग्रस्त भागांमध्ये लेप्टो प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
कणकवली, बोर्डवे, अशिये, कळसुली, शिरवल, वागदे, साकेडी, तरंदळे, हुबरट, नांदगाव, नागवे आधी गावातील रुग्णांचा समावेश आहे.जोखिमग्रस्त गावांमध्ये जुलै-ऑगस्ट व ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गोळ्यांचे वाटप तसेच सर्वे ही सुरू आहे.तालुक्यात आतापर्यंत एक लेप्टो पॉझिटिव्ह व दोन लेप्टो सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे तापसरीच्या रुग्णांनी तातडीने शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करून घ्यावेत, असे आवाहन कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पोळ यांनी केले आहे.