काळाची पावले ओळखून महिलानी सर्व क्षेत्रात प्रगती करावी….. सौ.उर्मिला यादव यांचे प्रतिपादन

काळाची पावले ओळखून महिलानी सर्व क्षेत्रात प्रगती करावी….. सौ.उर्मिला यादव यांचे प्रतिपादन

*कोकण Express*

*काळाची पावले ओळखून महिलानी सर्व क्षेत्रात प्रगती करावी….. सौ.उर्मिला यादव यांचे प्रतिपादन*

कणकवली ः प्रतिनिधी*

बदलत्या काळाची पावले ओळखून आत्ताच्या तरुण मुलीनी व महिलानी राजकारणासह सहकार क्षेत्रात मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे असे प्रतिपादन जागतिक महिला दिनानिमित्त बोलताना केले.
8 मार्च च्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लावण्यसिंधु लोककला व चित्रपट सहकारी संस्थेतर्फे कणकवली येथे महिला दिन कार्यक्रम येथील श्री भवानी सभागृहात संपन्न झाला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेने आतापर्यंत राबविलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच सध्या संस्थेतर्फे विविध विषयांवर डॉक्युमेंट्री फिल्म निर्मिती करण्यावर भर दिला जात असून जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था व कलाकारानी एकत्र काम केल्यास त्याचा लाभ सर्वानाच होणार असल्याचे सांगितले. संस्थेच्या संचालिका तथा अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी चित्रपट व मालिका करताना कलाकार म्हणून आपल्याला आलेले अनुभव कथन केले.
यावेळी जिल्ह्यातील सांस्कृतिक व कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या सावंतवाडी च्या सौ. गौरी नितीन बांदेकर, कुडाळच्या कु. भावना गुरुदास प्रभू, देवगड येथील सौ.आदन्या अभिषेक कोयंडे,कलमठ येथील कु. आर्या किशोर कदम,व करंजे येथील सौ. रश्मी मधुसूदन सोगम यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला. कु. आर्या कदम हिने मी सावित्रीबाई फूले बोलतेय म्हणत जोरदार व्याख्यान दिले. सर्व सत्कारमूर्तिनी इथे आपण एक स्त्री म्हणून अभिनय, नाट्य,एकांकिका,वक्तृत्व, चित्रपट, लघुपट करताना घरच्या पुरुषांची चांगली साथ मिळाल्यामुळेच आतापर्यंतची झेप घेऊ शकल्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. नितीन तळेकर,संचालक श्री. संतोष सावंत,कॅमेरामन श्री. रविकिरण शिवलकर,फोटोग्राफर श्री. धनंजय हळर्णकर तसेच श्री.नंदकुमार आरोलकर, किशोर कदम,सौ. वैभवी चौकेकर, सौ.धनश्री हळर्णकर,श्रद्धा सारंग,रश्मी उपरकर, रत्नप्रभा कोंडसकर, सौ.राठोड मॅडम,श्रीमती.दाभोलकर,
त्याचप्रमाणे दीपा सरूडकर , स्मिता बुटाले , शुभांगी उबाळे , दिव्या साळगावकर , लक्षुमी गवस ,जान्हवी परब ,दीपा परब ,गंधाली तिरफणकर ,स्नेहा कदम ,आर्या कदम ,अमिता राणे ,अक्षता गोसावी,वैशाली राणे,अमिता गावडे ,श्रेया नाईक ,पूजा राणे ,मिलन पाटील,अनिशा राऊळ, साक्षी आमडोस्कर ,सरिता पाटील, अर्चना राणे,सलोनी मेस्त्री,सुप्रिया पाटील,अर्चना सावन्त

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!