*कोकण Express*
*मालपे वासीयांचा रस्त्यासाठी आक्रोश ,लोकप्रतीनीधींच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल*
*कासार्डे ः संजय भोसले*
देवगड तालुक्यातील मालपे गावाला निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असून पर्यटकांच्या दृष्टीआड असलेला या अनमोल ठेव्याला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रहन लागले असून ग्रामस्थांच्या विकासाच्या वाटाच बंद झालेल्या आहेत.त्यामुळेपर्यटन स्थळ असलेल्या मालपे गावाच्या प्रगतीला रस्त्यावर पसरलेल्या असंख्य खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे चांगलीच खिळ बसली आहे.
विजयदुर्ग तळेरे राष्ट्रीय महामार्गपासुन मालपेतिठा ते मालपे गाव पर्यंतच्या ३कि.मी डांबरी रस्त्याची अक्षरशः दूर्दशा झाली असून याठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की, खड्ड्यात रस्ता असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने या रस्त्यावरून लोकांना धड साधे चालत जाणेही कठीण होऊन बसले आहे.
रस्त्याच्या या अवस्थेमुळे मालपे गावातील रुग्ण , ग्रामस्थ,शाळकरी मुले ,महिलांचे आणि विशेष करून वाहनधारकांचे अनोनात हाल होत आहेत.
याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासने लक्ष देऊन त्वरीत रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्या येईल असा इशारा मालपे गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते जयवंत केसरकर,सौ.वर्षा समजीसकर, संजय मसूरकर ,शकिल शिरगावकर,ऋचिता सूतार व पोलीस पाटील विलास सुतार यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी दिला आहे.डांबरी रस्त्याच्या या दैनिय अवस्थाबाबत लोकप्रतीनीधीच जबाबदार आहेत अशी प्रत्येक ग्रामस्थांची प्रतीक्रिया आहे.
येत्या पावसाळ्या पर्यंत जर हा रस्ता दुरूस्त नाही झाला तर मालपेवासीयांचा सर्व गावांशीच संपर्क तुटणार असून लोकांना अनेक अडचनींना सामोरे जावे लागणार आहे.सध्या ज्या रस्त्यातून धड चालताही येत नाही अशा रस्तावरून अत्यावस्त रूग्न , डिलीव्हरी साठी महीला यांना पावसाळ्यात दूरच्या दवाखाण्यात कसे घेवून जायचे हा यक्ष प्रश्न गावकय्रांना भेडसावतोय.त्यामूळे साहजिकच त्यांच्या भावना तीव्र असून लवकरच संबधीत अधिकाय्रांना लेखी निवेदन देवून मोठे आंदोलन उभारणार असल्याचे जयवंत केसरकर यांनी सांगीतले तर पोलीस पाटील विलास सुतार यानी विजयदुर्ग हायवेवरच ठिय्या आंदोलन करणार असल्याचे ठणकावून सांगीतले.तरी संबधीत अधीकाय्रानी आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये .लवकरात लवकर रस्ता दुरूस्त करावा अशी मागनी समस्त महीला वर्गाने केली आहे.