*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची बदली?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दोन महिन्यापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात चे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झालेले डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची बदली झाल्याची चर्चा जिल्ह्याच्या आरोग्य वर्तुळात सुरू आहे. यापूर्वीचे शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची नियुक्ती झाली होती. सत्ताधारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची ही डॉक्टर चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत नाराजी असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर डॉक्टर चव्हाण यांच्या बाबतीत काय निर्णय होणार याकडे लक्ष असतानाच अचानक त्यांच्या बदली चे वृत्त जिल्ह्याच्या आरोग्य विभागात चर्चिले जाऊ लागले आहे. कोरोना काळातील निधीच्या मुद्द्यावरून यापूर्वीचे शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर हे संशयाच्या भोवर्यात सापडले होते. नुकतीच डॉक्टर चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. सत्ताधारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून डॉक्टर चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर पालकमंत्र्यांकडे नाराजी बोलून दाखविल्याचे समजते. याबाबत डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता अध्याय बदलीचे आदेश प्राप्त नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र माझ्या बदलीसाठी काही दिवस प्रयत्न सुरू होते असे सांगत बदलीच्या हालचालींना त्यांनी दुजोरा दिला आहे.