*कोकण Express*
*जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळयांच्या वतीने सौ सरिता राजन चव्हाण यांचा श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान*
दिनांक ०८/०३/२०२२ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन *नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ* (आप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली) *आपण आहात म्हणून आम्ही* *ॐ नमो भगवते भालचंद्राय* यांच्या वतीने *नारी शक्तीचा* केला सन्मान
सौ सरिता राजन चव्हाण (पवार ) यांचा श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत डॉक्टर श्री सतिश पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री सुशांत दळवी, नगरपंचायत कणकवली चे माजी कर्मचारी श्री सुभाष उबाळे उपस्थित होते
यावेळी श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर असे म्हणाले कि ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रीन आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, तीच सुरूवात आहे आणि सुरूवात नसेल तर बाकी सर्व व्यर्थ आहे.
यावेळी उपस्थित सर्वानी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.