*कोकण Express*
*पदर प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वान महिलांचा सन्मान…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महिला दिनानिमित्त पदर प्रतिष्ठानतर्फे शहरातील कार्य कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये नूतन कडुलकर, वैशाली शिरोडकर, दर्शना मुसळे, जयश्री जाधव, वंदना तांबे, राजश्री परब, जानकी फोंडेकर, मधुरा कुवळेकर, लक्ष्मी जाधव,
शैला राणे, सविता पुजारे, देवयानी वरसकर, श्वेता नाईक, रुपाली सरंगले, उमा घाडी आदींना पदर प्रतिष्ठानच्यावतीने शाल श्रीफळ व भेट वस्तू देवून जी.प.अध्यक्षा संजना सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी पदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, अभिनेते दिगंबर नाईक, नगरसेवक
संजय कामतेकर, अभिजीत मुसळे, अॅड. विराज भोसले, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, अण्णा कोदे, अजय गांगण, पदर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मेघा गांगण, उपाध्यक्ष हर्षदा गावणकर, सचिव मीरा कवडे, खजिनदार सुप्रिया नलावडे, दिशा अंधारी, साक्षी वाळके, प्रियाला कोदे, अंकिता कर्पे, सल्लागार कविता राणे, मेघा सावंत, वर्षा बांदेकर, संजीवनी पवार, सायली मालंडकर, राजश्री धुमाळे, पंचायत समिती सदस्य भाग्यलक्ष्मी साटम, माजी पंचायत समिती सदस्य राजश्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते.