*कोकण Express*
*शिक्षक भारतीचा “नारीशक्ती पुरस्कार तळेरेतील सौ.अपर्णा अरविंद मुद्राळे यांना सन्मानपूर्वक प्रदान!*
*कासार्डे ः संजय भोसले*
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यातील महिलांचा अनोख्या पध्दतीने सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे त्या महिला ज्या क्षेत्रात काम करतात ती क्षेत्रे एकतर पुरूषी सत्ताक होती किंवा उपेक्षित होती . अशाच क्षेत्रात काम करणार्या नारी शक्तीचा वेध घेवून खर्या अर्थाने त्यांच्या कार्याचाच गौरव शिक्षक भारतीने केलेला आहे.त्यातीलच एक पुरस्कार प्राप्त तरेळेतील व्यक्तीमत्व होय.ते म्हणजे सौ. अपर्णा मुद्राळे होय.
गेली कीत्येक वर्षे तळेरे एस टी स्टँड परिसरात ऊन, वारा , पाऊस याची तमा न बाळगता पायी फिरून वर्तमानपत्र विक्री करून आपल्या पतीला संसाराचा गाडा चालवण्यासाठी मदत करीत आहेत. खरे म्हणजे हे क्षेत्र पांरपारिक पुरूषी हिस्याचे असून जग काय म्हणेल हे न पाहता सौ अपर्णा मुद्राळे यांनी या क्षेत्रात आपला पाय भक्कम रोवला आहे. एस् टी तून चढ उतार करणे, प्रत्येक प्रवाशांना वर्तमान पत्र घेण्यास राजी करने , उन्हा तान्हाची पर्वा न करणे यामूळे त्या गौरवास निश्चीतच पात्र आहेत. आणि शिक्षक भारतीने केलेली निवड हि रास्त आहे.
शिक्षक भारतीचा या पुरस्कार प्रदान सोहळ्याला कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक नारायण कुचेकर,तळेरे गावचे माजी सरपंच प्रविण वरुणकर, शिक्षक भारतीचे जिल्हा पदाधिकारी जनार्दन शेळके(कणकवली),दत्तात्रय मारकड (कासार्डे) शिक्षक भारती कणकवली तालुका अध्यक्ष प्रसाद मसुरकर
(कनेडी), सचिव संतोष राऊत(खारेपाटण), कार्याध्यक्ष संजय भोसले(कासार्डे), कणकवली तालुका पदाधिकारी अवधूत घुले(कासार्डे),स्वप्निल पाटील (सचिव वैभववाडी) यांच्या विशेष उपस्थितीत कणकवली तालुका महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा सौ.सविता जाधव(कासार्डे हाय.),श्रीम-धनलक्ष्मी तळेकर,(तळेरे हाय.) व श्रीम-प्रतिभा पाटील(तळेरे हाय.) या महिला शिक्षिकांच्या शुभहस्ते सौ अपर्णा मुद्राळे यांना शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र प्रदान करुन विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सौ. मुद्राळे यांचे पती अरविंद उर्फ भाई मुद्राळे, मुलगा योगेश मुद्राळे, सून सौ. मुद्राळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय मारकड यांनी तर प्रसाद मसुरकर यांनी पुरस्कार बद्दल माहिती विशद करीत सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुरस्कारासाठी निवड करून हा मानाचा पुरस्कार आपल्या पत्नीला सन्मानपूर्वक प्रदान केल्याबद्दल सौ. मुद्राळे यांचे पती श्री.अरविंद मुद्राळे यांनी शिक्षक भारतीचे विशेष आभार मानून सर्वांना धन्यवाद दिले.