*कोकण Express*
*औद्योगीक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट ता. कणकवली यांच्या विविध विषयां संदर्भात बैठक संपन्न*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
औद्योगीक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट ता. कणकवली यांच्या विविध विषयां संदर्भात बैठक सन्मा. खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज फोंडा आयटीआय येथे पार पाडली. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीशजी सावंत, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी रमण पाटील, प्राचार्य फोंडा नितीन पिंडकुरवार, प्रभावळकर सर, संग्राम प्रभुगावकर, जि. प. सदस्य संजय आंग्रे, विभागप्रमुख बाबू राणे, संदेश पटेल, आबु पटेल, चेअरमन सुभाष सावंत, राजू पटेल, राजन नानचे, पिंटू पटेल, रंजन चिके, राजू राणे, शाखाप्रमुख सुरेश टकके, राजू शिरोडकर, श्याम भूवड , रंजन चीके, बंटी उरणकर, अविनाश सापळे, माधवी दळवी, कोलते मॅडम व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी खासदार साहेबांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आयटीआय संदर्भात समस्या जाणून घेतल्या व रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच नवीन ट्रेड सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे मागणी करण्याची ग्वाही दिली.