महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे कुडाळ तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे कुडाळ तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

*कोकण Express*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे कुडाळ तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन…*

*पिंगुळी धुरीटेंबनगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर व स्वस्त दरात चष्मे वाटप कार्यक्रम*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

दि. ९ मार्च २०२२ रोजी मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित पिंगुळी धुरीटेंबनगर शाखा कुङाळ आयोजित भव्य मोफत नेञ तपासणी व स्वस्त दरात चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कुडाळ तालुकाअध्यक्ष प्रसाद गावङे यांच्या हस्ते व दिप प्रज्वलन माजी तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य बाबल गावङे ,दिव्या गावङे , उदया धुरी ,तालुका सचिव राजेश टंगसाळी ,उपतालुका अध्यक्ष दिपक गावङे,माणगाव उपतालुका अध्यक्ष सचिन सावंत ,विभाग अध्यक्ष सुंदर गावङे ,माणगाव विभाग अध्यक्ष सचिन ठाकुर ,व ग्रामस्थ उत्तम धुरी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचे नियोजन शाखाध्यक्ष श्री. वैभव धुरी, शुभम धुरी ,गजानन राऊळ ,तुषार धुरी , रुपेश धुरी ,गोविंद धुरी, भरत धुरी ,अनंत धुरी ,शमिका धुरी उर्मिला धुरी ,वैशाली धुरी, दिपाली धुरी यांनी उत्कृष्ट प्रकारे केल्याने 50 हुन अधिक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच या कार्यक्रमानिमित्त कालच्या महिला दिनाचे औचित्य साधून कोरोना काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका श्रीम. साक्षी शेलटे यांचा ग्रामपंचायत सदस्या श्रीम.उदया धुरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शिबिराचे आयोजन केल्याने लाभार्थी ग्रामस्थांनी मनसेचे आभार मानले.या शिबिराला जिल्हा पाणी नियोजन सदस्य अजय आकेरकर, पिंगुळी सोसायटी संचालक सुरेंद्र गायचोर, जनार्दन धुरी ,केशव पिंगुळकर,ग्रामपंचायत कर्मचारी गणेश शेटकर व शंकर धुरी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.आजच्या वर्धापन दिनी सायंकाळच्या सत्रात पणदूर येथील संविता आश्रमात बांधवांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!