उद्याचा देशव्यापी संप यशस्वी करण्याचा निर्धार

*कोकण Express*

*उद्याचा देशव्यापी संप यशस्वी करण्याचा निर्धार!*

 *सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या सभेत निर्णय*

*मालवण ः प्रतिनिधी*

गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी राज्य व देशभरातील कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विविध मागण्यांकरीता शासनाचे लक्षवेध करण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक संप होत असून देशभरातील सुमारे वीस कोटी कामगार व कर्मचारी मिळून संपावर जाणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा संप यशस्वी करण्याचा निर्धार राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या संप पार्श्वभूमीवर आयोजित नियोजन व आढावा बैठकीत करण्यात आला. तसेच अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना याबाबत पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक पतपेढीत शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांचे अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक पार पडली.यावेळी समन्वय समितीचे सरचिटणीस राजन वालावलकर,राज्य सरकारी निमसरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव एस.एल.सपकाळ,शिक्षक नेते चंद्रकांत अणावकर,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम,जिल्हा नेते नंदकुमार राणे,जिल्हा सरचिटणीस सचिन मदने,पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख सभेचे जिल्हा सरचिटणीस सुहास सावंत,शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष दिनकर तळवणेकर, शिक्षक समितीचे राज्य सहसचिव नामदेव जांभवडेकर,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कर्मचारी समन्वय समितीने संप पुकारल्यावर भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येतो परंतु सद्या कोरोना संक्रमण कालावधी असल्याने मोर्चा टाळण्याचा निर्णय घेण्यात आला. याऐवजी समन्वय समिती व घटक संघटनांचे जिल्हा पदाधिकारी गुरुवारी सकाळी ११वाजता जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग यांना मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना देण्यासाठीचे निवेदन सादर करतील.तर प्रत्येक तालुक्यात घटक संघटनांचे तालुका पदाधिकारी तहसीलदार यांना निवेदन सादर करतील असे कळविण्यात आले आहे.

संपात समन्वय समितीच्या सर्व घटक संघटना उतरल्या असल्याने व संप यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी तयारी पूर्ण झाल्याने जिल्हयात संप यशस्वी होईल असा विश्वास यावेळी समन्वय समितीच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!