*कोकण Express*
*घोणसरी सोसायटी निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गांगेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनेलचा विजय*
*भाजप पुरस्कृत पॅनेलला जोरदार धक्का*
*कणकवली ः प्रतिनिधी*
फोंडाघाट गावातील घोणसरी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गांगेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनेल ने भाजपा पुरस्कृत श्री सिद्धिविनायक सहकार पॅनेलचा धुव्वा उडवत १२ पैकी १० जागा जिंकून घोणसरी सोसायटीवर वर्चस्व मिळवले.भाजप पुरस्कृत पॅनेलला जोरदार धक्का बसला आहे.
घोणसरी सोसायटीच्या विजयी संचालकांचे माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि.प.सदस्य संजय आग्रे ,जि प माजी सभापती संदेश पटेल, फोंडाघाट सोसायटी चेअरमन सुभाष सावंत, राजन नानचे यांनी अभिनंदन केले. निवडणुकीत एकूण २५ मते बाद ठरली. घोणसरी सोसायटी निवडणूकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, पं स सभापती मनोज रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश झाला होता. मात्र मतदानंतर लागलेल्या निकालात शिवसेनेने भाजपला धक्का दिला.
शिवसेनेच्या वतीने घोणसरी सोसायटी निवडणुकीत जि.प.सदस्य संजय आग्रे यांनी विरोधकांना जोर का झटका दिला. शिवसेनेचे दीपक पुंडलिक राणे, उदय अनंत राणे, विश्वजित अनंत राणे, प्रकाश प्रभाकर हिर्लेकर, रामदास महादेव इंदुलकर, भास्कर सीताराम साळवी, ऐश्वर्या अनंत सावंत, श्रद्धा अनंत राणे, कृष्णा महादेव एकावडे, रामा सोमा जाधव हे उमेदवार संचालकपदी निवडून आले आहेत. तर भाजपचे मकरंद प्रकाश पारकर, मॅक्सि पेद्रु पिंटो हे दोन उमेदवार संचालकपदी निवडून आले. शिवसेना पुरस्कृत पॅनल च्या विजयासाठी दीपक सावंत, दीपक राणे, दर्शन मराठे, बाबाजी राणे, प्रसाद राणे, विजय मराठे , संतोष शिंदे, रवी शिंदे, आबु ऐंडे, गोटू राणे, संतोष सावंत, अनिल सावंत, आबा आयरे, मनोहर गुरव, प्रमोद राणे, संतान मामा, नितीन एकावडे, सचिन सुतार, संदीप सुतार, छोटू खाडये आदींनी मेहनत घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किरण कांबळी यांनी काम पाहिले.