*कोकण Express*
*नांदगाव हायस्कूल येथे सुरेश प्रभु यांच्या माध्यमातून सायकल वाटप*
*नांदगांव ः प्रतिनिधी*
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग व विमान प्राधिकरण यांच्या वतीन नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल मधील 10 विदयार्थीनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले . सदर सायकल मिळण्यासाठी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी सातत्याने जनशिक्षण चे विलास हडकर यांच्या जवळ पाठपुरावा केला होता.
सायकलचा 10 विदयार्थींनीना लाभ मिळाल्याने संस्थेचे व पंढरी वायंगणकर यांचे विशेष आभार मानले आहेत.
नांदगाव हाय.मधील सुहानी तांबे,सोनल सुतार ,वैदही विनोद मोरजकर, नेहा कदम , पल्लवी मेस्त्री ,प्राची खरात , साक्षी बांदीवडेकर ,संचिता सावंत ,सृष्टी मोरये ,सानिका सकपाळ या मुलीना लाभ मिळाला आहे.
यावेळी असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,हाय.संस्था खजिनदार सुभाष बिडये ,असलदे उपसरपंच संतोष परब ,मुख्याध्यापक श्री .तांबे सर, श्री.पाटकर सर , नलावडे मॅडम आदी शिक्षक वृंन्द उपस्थीत होते.