*कोकण Express*
*ओझरमच्या सरपंच पदी प्रशांत प्रभाकर राणे यांची वर्णी*
*कासार्डे ः संजय भोसले*
कणकवली तालुक्यातील ओझरम गावच्या रिक्त असलेल्या सरपंचपदी श्री. प्रशांत प्रभाकर राणे याची निवड झाली. उपसरपंच पदी असलेले प्रशांत राणे याची रिक्त असलेल्या जागी निवड करण्यात आली.
ओझरम सरपंच पद काही दिवस रिक्त होते. तत्कालीन सरपंच याचे निधन झाल्याने हे पद रिक्त होते. ओझरम सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासीठी राखीव असल्याने या रिक्त जागी उपसरपंच असलेले प्रशांत राणे याची सरपंच म्हणून निवड करण्यात आली.त्याच्या निवडीबद्दल माजी सभापती दिलीप तळेकर याच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण आले.यावेळी ग्रा.पं.सदस्य समुध्दी राणे,राजश्री राणे, विशाखा तांबे, समाधान धुरी,सुधाकार राणे, ग्रामसेवक जी.वाय. बोडेकर,पोलीस पाटील तुषार तांबे, दिलीप तांबे,नागेश पाळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी सुनिल पांगम यानी काम पाहीले. गावच्या विकासात्मक कामासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच प्रशांत राणे यानी सांगितले.
फोटो :ओझरम सरपंच पदी श्री. प्रशांत राणे याची निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना दिलीप तळेकर, सुधाकर राणे,उमेश राणे, वाय.जी. बोडेकर, समाधान धुरी आदी उपस्थित