*कोकण Express*
*तरेले- विजयदुर्ग महामार्ग बंद*
*कासार्डे ः संजय भोसले*
देवगड- महाळूनगे गावात जाणारा फणसगांव शेवरे हा रस्ता गेले अनेक वर्षे नादुरुस्त आहे,वारंवार निवेदने देऊन प्रशासना कडून कोणतीही सकारत्मक करवाई झालेली नाही,पंतप्रधान ग्रामसडक सड़क योजना व जिल्हा परिषद बांधकाम विभाग हे रस्ता दुरुस्ती करीता प्रस्तावित आहे. यापालिकडे काही सांगतच नाहीत,या रास्त्यामुळे ग्रामस्थ हवालदिल झालेआहेत. वेळेत उपचार न मिळाल्या मुळे दोघांना जीव गमवावा लागला कोणताही खाजगी वाहन चालक रस्ता खराब असल्याने गावात यायला मागत नाही या सगळ्या समस्याना वैतागुन ग्रामस्थस्नी सरपंच संदीप देवलेकर यांच्या नेतृत्वा खाली सकाळी फणसगांव या ठिकाणी रस्ता अडविला त्यामुळे या मार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती
यावेळी पंतप्रधान ग्रामसडक चे भूपेंद्र मोंडकर व जिल्हा परिषद बांधकाम चे रावसाहेब तांबे यानी मागणी चे निवेदने स्वीकारुन उद्या २२ फेब्रूवारी रोजी संबधीत अधिकाऱ्यां सोबत मीटिंग घडवून योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन दिल्या नंतर रस्ता रोको स्थगित करण्यात आला
या रास्ता रोको मधे महिलांचा मोठा सहभाग होता,यावेळी गोवल सरपंच राजू जठार,महेश नारकर, रामकृष्ण राणे,दीपक परब,आत्माराम तोरस्कार,संदीप राणे,मोहन घाडी,दीपक घाडी,मुकुल सावंत, शशिकांत मेस्त्री,सतीश घाडी,सुभाष नवले,स्नेहा साटम, आकांशा राणे,संचिता नवले,सानिका साटम,कृष्णा नवले,राजेन्द्र घाडी,अजित राणे,दशरथ राणे,नितिन सावंत,अनिल सावंत,सचिन घाडी,अक्षय घाडीगावकर,मारुती घाडी,मंगेश राणे,सुमित राणे,संतोष यादव,नीलेश यादव आदि ग्रामस्थ उपस्थित होते
एक