*कोकण Express*
*नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाच्या लढ्यास यश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दि. २६/०१/२०२१ रोजी नविन कुर्ली ग्रामविकास मंडळ ( रजि.) यांचा माध्यमातून मा.जिल्हाधिकारी , सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण छेडन्यात आले होते .त्यामध्ये प्रामुख्याने तीन मागण्या समोर ठेवण्यात आल्या होत्या.
*१.नवीन कुर्ली या ठिकाणी तात्काळ ग्रामपंचायत मंजूर होनेबाबत.*
*२.मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यायी शेत जमिन देणेबाबत.*
*३.सन१९९९ च्या पुनर्वसन अधीनियमनुसार १८ नागरी सुविधा मिळणेबाबत.*
उपोषणाच्या दहाव्या दिवशी मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि संबंधित अधिकारी यांची प्रकल्पगस्त प्रतिनिधि यांचे समवेत सभा आयोजित करण्यात आली आणि प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या लेखी स्वरुपात देण्यात आल्या .
त्यामधील मागणी क्र.३ मधील १८ नागरी सुविधेबाबत संबंधित अधिकारी यांनी १९८६ च्या पुनर्वसन अधिनियमानुसार १३ नागरी सुविधा मंजुर असलेबाबत लेखी स्वरुपात पत्र देण्यात आले. त्यानुसार नागरी सुविधांच्या कामच्या नुतणीकरणा संबंधात अंदाजपत्रक तयार करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जलसंपदा विभागास आदेश दिले. त्यानंतर नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ (रजि) यांनी सलग १ वर्ष या पूर्ण प्रक्रियेचा पाठपुरावा केला. मा. जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे स्थरावरून अंतिम मंजूरी प्राप्त करून घेण्यात आली.
नवीन कुर्ली या पुनर्वसन गाठणात आमच्या मंडळामार्फत सन २००६ मध्ये नळ योजना मंजूर करून घेण्यात आली. तेव्हापासून आजतागायत जलसंपदा विभागाकडून सदर नळ नवीन योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रतिवर्षी निविदा प्रसिद्ध केली जाते आणि ठेकेदारकरावी नळयोजना चालविली जाते त्यामुळे काही दिवसापूर्वी कोण्या एका स्वयंघोषित समिती अध्यक्षाने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण गावात स्वतः विनामूल्य पाणीपुरवठा करत असलेबाबत केलेले वक्तव्य हे दिशाभूल करणारे आहे.
आमच्या मंडळाने सन 2006 मध्ये छेडलेल्या पोषणाचे फलित म्हणून नवीन कुर्ली गावठाणास स्मशान शेड तसेच पिकअप शेड पाटबंधारे विभागाकडून मंजूर करण्यात आली होती परंतु स्मशान शेड बांधकाम करावयाची नियोजित जागा ही निवासी भूखंडाच्या लगत असण्यात असल्याकारणाने संपूर्ण स्मशान शेड सभोवताली १२फूट उंचीची भिंत बांधण्यात यावी आणि पिकअप शेड चे बांधकाम प्रकल्पग्रस्तांना सोयीस्कर होईल अशा जागी मान बांधण्यात यावे अशी रास्त मागणी प्रकल्पग्रस्तांना कडून करण्यात आली होती.
सदर मागणी प्रकल्पग्रस्तांनी लावून धरली होती. परंतु दरम्यानच्या काळात काही स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या आमच्या मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर सदर व्यक्तीने काही संबंधित अधिकारी यांनी संगनमताने स्मशान शेड आणि पिकप शेड ही दोन्ही कामे निकृष्ट आणि योग्य पद्धतीने पूर्ण करून शासकीय निधीचा अपव्यय केलेला असून सदर सुविधेचा प्रकल्पग्रस्तांना कोणताही वापर योग्यरीत्या करता येत नाही.
सदर पत्रकार परिषदेमध्ये तथाकथीत कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबई अध्यक्ष वक्तव्य करीत असलेला दिसत आहे. ज्याने प्रकल्पग्रस्तांच्या नावावर मंडळाच्या माध्यमातून नाटकाचे तिकिटे छापून प्रकल्पग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीचा अपव्यय केलेला असून प्रकल्पग्रस्त आणि मंडळाचे सभासद जाब विचारतील म्हणून मागील तीन वर्षापासून मंडळाची सभा आयोजित केलेली नाही दिनांक २६/०१/२०२१ रोजीच्या उपोषणासाठी वर्गणी काढण्यात आली असे वक्तव्य करण्यात आले होते. परंतु आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आम्ही स्पष्ट करीत आहोत की आजपर्यंत आमच्या मंडळाने कोणत्याही प्रकारची वर्गणी आजतागायत जमा केलेली नाही किंबहुना प्रकल्पग्रस्तांनी स्वच्छेने उपोषणासाठी मोठ्या प्रमाणात लढा निधी उभारला आणि आमच्या लढ्यात सहकार्य केलेले आहे. नवीन पुनर्वसित गावठाणात चे महसुली गाव होण्याबाबत शासकीय राजपत्र सन २००२ साली पारित करण्यात आले त्यानंतर आमच्या मंडळाने सन २००७ रोजी नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केलेला होता. त्याबाबतीत आतापर्यंत तीन ग्रामविकास मंत्री महोदय यांना प्रत्यक्ष भेटून पाठपुरवठा केलेला आहे. त्यामुळे नवीन ग्रामपंचायत होण्यासाठी आमच्या मंडळाने केलेला प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे म्हणून काही समाजविघातक आणि स्वयंघोषित तथाकथित समितीचे अध्यक्ष सर्व श्रेय स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहेत. परंतु मागील 35 वर्षापासून अखंडपणे लढा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आणि प्रकल्पग्रस्तांसाठी अहोरात्र काम करीत असलेले आमचे मंडळ कदापिही भीक घालणार नाही उपरोक्त सर्व घडामोडींचा निषेध करण्यासाठी आणि आंदोलनातून मिळालेले यश साजरे करण्यासाठी आज पत्रकार परिषद आणि ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे.
नवीन कुर्ली ग्राम विकास मंडळ रजि च्या विशेष ग्रामसभा व पत्रकार परिषदेत उपस्थित अध्यक्ष श्री राजेंद्र कोलते, सचिव श्री धीरज हुंबे, खजिनदार तथा प्रवक्ता श्री रविंद्र नवाळे, सदस्य कृष्णा परब, हरेश पाटील,अमित दळवी, राजेन्द्र तेली,अरूण पिळणकर, एकनाथ चव्हाण, पांडुरंग चव्हाण, भगवान तेली, सदाशिव राणे, अविनाश चव्हाण, योगिता मडवी, प्रिया दळवी,शंकर राणे ,प्रशांत दळवी, सचिन साळसकर, उत्तम तेली,मंगेश मडवी, प्रकाश दळवी, आत्माराम तेली,प्रकाश हुंबे, अरुण चव्हाण,नामदेव चव्हाण, अनिल दळवी, सदानंद पाटील, आनंद सावंत, नारायण वाडेकर,शिवराम पोवार तसेच कुर्ली उत्कर्ष मंडळाचे सदस्य दिनेश भोगले आदी असंख्य प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती .