*कोकण Express*
*युवासेना उपतालुकाप्रमुख पदी सचिन आचरेकर यांची निवड…!*
*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली नियुक्ती जाहीर..!*
*आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार युवासेना कणकवली उपतालुका प्रमुखपदी कलमठ येथील सक्रिय शिवसैनिक सचिन आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी ही नियुक्ती जाहीर केली. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्री आचरेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर,जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, कलमठ येथील मानकरी सुनील नाडकर्णी, उद्योजक सतीश नाईक, राजू शेट्ये, संकेत नाईक, जि प सदस्य स्वरूपा विखाळे, रामदास विखाळे, भूषण परुळेकर, राजू राठोड, ललित घाडीगांवकर, अनुप वारंग, रुपेश जाधव, रुपेश आमडोस्कार, सरपंच धनश्री मेस्त्री, उपसरपंच ऍड. हर्षद गावडे, सचिन आचरेकर, समीर आचरेकर, निसार शेख, रिमेश चव्हाण, आदी उपस्थित होते.