साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘सिंधू आरोग्य’ मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘सिंधू आरोग्य’ मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

*कोकण Express*

*साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘सिंधू आरोग्य’ मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

केवळ पद मिळवण्यासाठी काम न करता सर्वसामान्य जनतेला भासणाऱ्या गरजा व समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांच्या पुढाकाराने आज साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘सिंधू आरोग्य’ मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्याचे दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला.यावेळी आरोग्य शिक्षण सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी,साटेली भेडशी सरपंच लखु खरवत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सारंग,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.चिपळूणकर डेरवण येथील स्पेशालिस्ट डॉ.भोसले,डॉ.शिंदे,डॉ.दरेकर,डॉ.माने,सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ.शाम पाटील,डॉ.पाटील,एसएसपीएम हरिश्चंद्र परब आदी उपस्थित होते.
या शिबिरात तालुक्यातील २५८ जणांनी लाभ घेतला.सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी यांनी घेतलेल्या या उपक्रमामुळे या भागातील लोकांना मोफत तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!