नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने *संत रोहिदास यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधुन कणकवली परिसरातील पाच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना सदिच्छा भेेट

नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने *संत रोहिदास यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधुन कणकवली परिसरातील पाच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना सदिच्छा भेेट

*कोकण Express*

*नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने *संत रोहिदास यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधुन कणकवली परिसरातील पाच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना सदिच्छा भेेट*

*कणकवली ः प्रतिनिधी*

दिनांक १६/०२/२०२२ रोजी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ(आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) *आपण आहात म्हणून आम्ही* *ॐ नमो भगवते भालचंद्राय* यांच्या वतीने *संत रोहिदास यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधुन कणकवली परिसरातील पाच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना सदिच्छा भेट दिली.

जेष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर यांच्या हस्ते तसेच श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत सर्वांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
आपापल्या क्षेत्रात धर्म, जात, पंथ, लिंगभेद, यांचा विचार न करता, सातत्य ठेवून स्वीकारलेल्या कामाचा समाजाने कौतुकाने स्विकार करावा अशा पद्धतीने जिवन जगून एक प्रकारे “कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन हे ” गीता वचन त्यांनी प्रत्यक्षात आणले, हा एक समान धागा त्यांच्या भेटीचा व त्या निमित्ताने त्यांच्या सत्काराचा होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्री अशोक करंबेळकर यांनी केले.
या प्रसंगी पटवर्धन चौकातील श्री जयवंत (जया शेठ) जाधव(फुल वाले) पोलीस दलातील मित्र श्री विनायक महादेव चव्हाण (सहाय्यक पोलीस फौजदार)
पत्रकार व न्यूज चॅनेल चे श्री राजन चव्हाण
महिला उद्योजिका सौ. मयुरी चव्हाण आणि विद्यार्थी वर्गावर संस्कार करणारे श्री सुरेश रामचंद्र हरकुळकर (प्राथमिक शिक्षक) यांना भेटुन त्यांच्याशी संवाद गप्पा करून प्रत्येकाच्या कामाच्या पध्दतीची माहिती घेण्यात आली.
सर्वांशी भेट झाल्या नंतर शांत संयमी वृत्ती, कामावरील निष्ठा व सचोटी आणि वेळप्रसंगी दाखविली जाणारी माणूसकी यांच्या बळावरच त्यांनी हे स्थान मिळवले आहे अशा शब्दात श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्या सत्कार मूर्तींच्या घरी गेलो तेथील अनुभव व आदरातिथ्य सकारात्मक होते, तसेच अशा व्यक्तींच्या सत्कार समारंभात उपस्थित राहून मला एक वेगळा अनुभव घेता आला, असे श्री सुशांत दळवी यांनी म्हटले
यावेळी उपस्थित सर्वानी सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीत वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!