*कोकण Express*
*कुडाळ मालवण तालुक्यात कोट्यावधींचा निधी मंजुरीचा ओघ सुरूच*
*पुन्हा एकदा सा. बां. विभागांतर्गत येणारे रस्ते दुरुस्तीसाठी १२ कोटीचा निधी मंजूर*
*आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश*
कुडाळ मालवण तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्यांसाठी पुन्हा एकदा १२ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून अलीकडेच ५० कोटीच्या रस्त्यांची कामे मंजूर होऊन कामे प्रत्यक्षात सुरु करण्यात आली असून त्यातील काही कामे पूर्णत्वास गेली आहेत. कुडाळ मालवण तालुक्यातील उर्वरित रस्त्यांसाठी निधीची आवश्यकता होती त्यानुसार खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्याने विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत पुन्हा १२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.
यामध्ये मठ कुडाळ पणदुर घोडगे रस्ता रा.मा. १७९ सुधारणा व डांबरीकरण करणे निधी १ कोटी, मालवण कसाल रस्ता रा.मा १८२ सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ५० लाख, वेताळ बांबार्डे हिर्लोक रस्ता प्रजिमा ३९ सुधारणा व डांबरीकरण करणे निधी १ कोटी ५० लाख, आकेरी आंबेरी वाडोस रस्ता प्रजिमा ५१ किमी सुधारणा व डांबरीकरण करणे निधी १ कोटी, नेरुर वालावल चेंदवण कवठी रस्ता प्रजिमा ४५ सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ७५ लाख, वालावल माऊली मंदिर कुशेवाडा आंदुर्ले केळुस मुणगी रस्ता प्रजिमा ४४ सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ७५ लाख, मालवण वायरी तारकर्ली देवबाग रस्ता प्रजिमा २८ सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ५० लाख, राठीवडे शिरवंडे असरोंडी ओसरगाव रस्ता प्रजिमा २९ सुधारणा व डांबरीकरण निधी ७० लाख , राठीवडे हिवाळे ओवाळीये कसाल ओसरगाव रस्ता प्रजिमा ३० सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ८० लाख, मालवण बेळणा रस्ता प्रजिमा ३२ सुधारणा व डांबरीकरण करणे १ कोटी, ओझर कांदळगाव मागवणे मसुरे बांदिवडे आडवली भटवाडी रस्ता प्रजिमा ५२ सुधारणा व डांबरीकरण करणे १ कोटी ५० लाख, रेवस विजयदुर्ग मालवण वेंगुर्ला शिरोडा सातार्डा प्रमुख राज्य महामार्ग क्र. ४ डांबरीकरण व नुतनीकरण करणे निधी १ कोटी २० लाख, कनेडी कुपवडे कडावल नारुर वाडोस शिवापूर शिरशिंगे रस्ता रा. मा. ८० लाख हि कामे मंजूर झाली आहेत लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले आहे.