*कोकण Express*
*भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांच्या विरोधात ॲड. प्रदीप घरत यांच्या युक्तिवादाला सुरुवात*
*गोट्या सावंत यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयाच्या हजर झालेल्या संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडून काही वेळात म्हणणे सादर झाल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाजू मांडत आहेत. तर गोट्या सावंत यांच्यावतीने ॲड. राजेंद्र रावराणे व ॲड. उमेश सावंत हे बाजू मांडत आहेत. यावेळी न्यायालयात माजी खासदार निलेश राणे, जिप अध्यक्ष संजना सावंत, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब ,कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली पंचायत समिती उपसभापती मिलिंद मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित.