*कोकण Express*
*आरोपी याच्या मैत्रिणीला फोन , मेसेज टाकल्याच्या कारणातून जाब विचारत ब्लेड् सदृश्य वस्तूने वार*
*तरुणावर गुन्हा दाखल*
व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला एका तरुणाकडून अल्पवयीन युवकावर ब्लेडने वार केल्याची घटना कणकवली शहरातील गणपती साना येथे काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी संशयित आरोपी विशाल भोजनिया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात गणपती सान्या जवळ काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास युवकावर ब्लेडने वार करण्याची घडलेली घटना ही नशेत केल्याचे समोर आले आहे. यातील संशयित आरोपी हा मद्यपान करून असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी अल्पवयीन असलेल्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार वार करणारा विशाल भोजनिया (राहणार, जानवली – कणकवली) याच्याविरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कणकवली शहरातील अल्पवयीन युवक असलेल्या फिर्यादीने संशयित आरोपी विशाल भोजनिया याच्या मैत्रिणीला फोन करत मेसेज टाकल्याच्या कारणातून जाब विचारत ब्लेड् सदृश्य वस्तूने वार करण्यात आले. यात फिर्यादीच्या हात व मानेला दुखापत झाली असून फिर्यादीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात अल्पवयीन युवक असलेल्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी च्या विरोधात ३२४,३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार येडवे करत आहेत.