*कोकण Express*
*सावंतवाडी पंचायत समितीच्या सभेत जिल्हा बँकेतील नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्हा बँकेत निवडून आलेल्या तालुक्यातील संचालकांचा आज सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रवींद्र मडगावकर, गजानन गावडे व विद्याधर परब यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपसभापती शीतल राऊळ, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, माजी सभापती पंकज पेडणेकर, बाबू सावंत, संदिप नेमळेकर, सुनंदा राऊळ आदी उपस्थित होते