*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर..*
*सिंधुदुर्ग*
आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. काही नियमांच्या अटीन अधीन राहून हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. त्यांच्याबरोबर असलेले दुसरे संशयित राकेश परब यांना देखील जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. कणकवली दिवाणी न्यायालयाने नितेश राणे शरण आल्यावर त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती आणि त्यानंतर 4 फेब्रुवारी रोजी त्यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कस्टडी दिली होती. त्यांनी जिल्हा न्यायालयात अपील केल्यानंतर आज त्यांच्या जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान नितेश राणे कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. त्यांच्या आरोग्याची तपासणी आणि उपचार सध्या तेथे सुरू आहेत.
नितेश राणे आणि राकेश परब यांना सशर्त जामीन मंजूर ; जामीनासाठी घातलेल्या अटी पुढील प्रमाणे
1) 30 हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्यात आली
2) दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यामध्ये प्रवेश बंदी.
3) तपासी आधिकारी तपासाला बोलवतील त्यावेळी चौकशीसाठी हजर राहणे
4) कणकवली तालुक्याबाहेर ज्या ठिकाणी वास्तव्य करणार त्या ठिकाणचा पत्ता देणे
5) दर सोमवारी 10 ते 12 या वेळेत ओरोस पोलीस ठाण्यात हजेरी लावणे
कणकवलीत शिवसेना शाखेसमोर फटाके. नितेश राणेंना जामीन मंजूर झाल्याचे जाहीर होता. कणकवलीत नरडवे नाका येथील शिवसेना शाखेसमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. देवगड शहरात सुदधा भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.