*कोकण Express*
*तरंदळे ,देदोनेवाडी लघू पाटबंधारे प्रकल्पासाठी निधी मंजूर…*
*अनेक वर्षे रखडलेले हे दोन्ही प्रकल्प आता लवकरच मार्गी…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरंदळे प्रकल्पासाठी १२६ कोटी ३९ लाख व देदोनेवाडी प्रकल्पासाठी ५६ कोटी तीन लाख ७९ हजाराचा निधी उपमुख्यमंत्री तथा अर्थमत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेले हे दोन्ही प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश आले आहे, अशी माहिती युवक ज़िल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी दिली आहे.
देदोनेवाडी व तरऺदळे लघू पाटबंधारे प्रकल्प पुर्णत्वास जावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमत्री अजितद पवार व जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या दोन्ही प्रकल्पाना सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे दोन्ही लघू पाटबंधारे प्रकल्प अनेक वर्षे अपूर्ण असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री पवार व जलसंपदामंत्री पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी बांधवानी आभार व्यक्त केले आहेत. तसेच हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला तशा सुचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे. या प्रलंबित प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचेही प्रकल्पग्रस्त भागातून अभिनंदन होत आहे.