*कोकण Express*
*वैभववाडी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सानिका सुनील रावराणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वाभवे- वैभववाडी नगरपंचायत च्या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने उडी घेतली असून सेनेच्या सानिका सुनील रावराणे यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत आज सकाळी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत बैठक झाली. शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचाशी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केलेल्या चर्चेअंती सानिका रावराणे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले. 17 पैकी 5 नगरसेवक असलेली शिवसेना 2 अपक्ष नगरसेवक हाताशी धरून भाजपाचा नगराध्यक्ष होण्यापासून रोखणार काय ? हे आता येत्या 14 फेब्रुवारी रोजी समजणार आहे. नामनिर्देशन दाखल करताना तालुकाप्रमुख मंगेश लोके , दिगंबर पाटील, नगरसेवक – रणजीत तावडे, प्रदिप रावराणे, सुनिल रावराणे, संतोष पवार, पपु डांगे व बाळा पाटील आदी उपस्थित होते.