*कोकण Express*
*भाजपाच्या प्राजक्ता बांदेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार*
*कुडाळमध्ये नगराध्यक्ष निवडीत होणार रस्सीखेच*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीत केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी प्राजक्ता अशोक बांदेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. कुडाळमध्ये सर्वाधिक 8 नगरसेवक असलेल्या भाजपाला चमत्कार घडविण्यासाठी फक्त 1 मताची गरज आहे. तर शिवसेनेकडे 7 आणि राष्ट्रीय काँग्रेसकडे 2 असे एकूण 9 नगरसेवक आहेत. राष्ट्रीय काँग्रेसने कुडाळ न. पं. च्या नगराध्यक्ष पदावर दावेदारी केली असून आता 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नगराध्यक्ष निवडीत भाजपा चमत्कार करणार काय ? हे आता समजणार आहे.