*कोकण Express*
*सावंतवाडीत मोती तलावाच्या काठावर “खाऊगल्ली” उभारणार….*
*दीपक केसरकर; केशवसुत कट्ट्याचे स्ट्रक्चरल ऑडिट, तुतारीचेही नूतनीकरण….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील मोती तलावाच्या काठावर आता माजी नगराध्यक्ष कै. दत्ताराम वाडकर यांच्या नावाने राजवाड्याच्या समोरील रिकाम्या जागेत “खाऊगल्ली” उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान केशवसुत कट्ट्याचे नूतनीकरण करण्याबरोबरच त्या ठिकाणी असलेली तुतारी नव्याने बसविण्यात येणार आहे. तत्पूर्वी केशवसुत कट्ट्याचे सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. केसरकर यांनी आज सायंकाळी नियोजित उद्यानाची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, वास्तुविशारद अमित कामत,ए व्ही कुलकर्णी, दत्ताराम गोठसकर, मुकुंद वझे उपस्थित होते.
*सावंतवाडीत मोती तलावाच्या काठावर “खाऊगल्ली” उभारणार….*
*दीपक केसरकर; केशवसुत कट्ट्याचे स्ट्रक्चरल ऑडिट, तुतारीचेही नूतनीकरण….*
*सावंतवाडी