*कोकण Express*
*सिंधुदुर्ग पोलीस बळाचा गैरवापर करतात*
*भाजपच्या कार्यकर्त्याना व नेत्याना नाहक गुन्हे दाखल करुन अडकवीण्याचा प्रयत्न*
भाजप सहन करणार नाही! जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*भाजपचे केद्रींय व राज्य नेते आम. नितेश राणे यांच्या पाठीशी. अतुळ काळसेकर!*
*सिंधुनगरी*
पोलीसांनीही आम. नितेश राणे यांना अडवून भादवी कलम ३४१ खाली प्रथम गुन्हा केला आहे. मात्र सिंधुदुर्ग पोलीस दल आपल्याकडील बळाचा व अधिकारांचा गैरवापर करीत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्याना व नेत्याना नाहक गुन्हे दाखल करुन अडकवीण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा भाजप निषेध करीत असून याची गंभीर दखल भारतीय जनता पार्टीने घेतली आहे. दोन दिवसांत भाजपचे जिल्हा कार्यकारिणीची बैठक होत असून जिल्हा पोलिस दलाकडून होणार्या या अन्यायाविरोधात भारतीय जनता पार्टीची भूमिकाही निश्चित होईल मात्र पोलीस बळाचा हा अन्याय भाजप सहन करणार नसल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी भाजप नेते अँड अजित गोगटे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित होते.
याच प्रश्नी चर्चा करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने वेळ मागितली होती. मात्र ते पोलिस अधीक्षक भवनात उपलब्ध झाले नाहीत. याबाबत जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची भाजप शिष्टमंडळाने भेट घेतली. जिल्हा पोलिसांच्या या दुजाभावाबद्दल तसेच पोलीस बळाचा गैरवापराबाबत लक्ष वेधले आहेत. जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांचे संरक्षण व गैरकृत्यांना पाठबळ मिळत आहे तर भाजप कार्यकर्ते व नेत्यांना जाणूनबुजून अडकविण्याचा पोलीस दल प्रयत्न करीत आहे अशा काही घटनांच्या आधारे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत. पुढच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपण लक्ष घालावे अशी विनंतीही या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. अशी माहितीही राजन तेली यांनी या पत्रकार परिषदेवेळी दिली.
न्यायालयाने आम नितेश राणे यांना दहा दिवसांचे अटकेपासून संरंक्षण दिले होते. तरी जिल्हा न्यायायालयातून ते बाहेर पडल्यानंतर त्यांना पोलीसांनी अडवीले, म्हणून भाजपचे प्रदेश सचिव डाॅ निलेश राणे यांनी पोलिसांना असे आपल्याला करता येणार नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. व पोलिसांनी त्यांच्यासह अन्य २० भाजप कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केलेत. खरेतर आम. नितेश राणे यांना अडवून पोलीसांनी ३४१ कलमाखाली गुन्हा प्रथम केला आहे. हा पोलीस बळाचा सरकारच्या दबावाखाली वापर सुरु आहे. हा अन्याय भाजप कधीही सहन करणार नाही. याबाबतही अँड अजित गोगटे, राजन तेली यांचे लक्ष वेधले.
जिल्हात राजरोजपणे बेकायदेशीर धंदे, दारुची तसेच वाळूची पोलिसांच्या आशिर्वादाने सुरु असलेली वाहतूक यात पोलीसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष आहेत. याबाबतही भारतीय जनता पक्ष पोलीसांच्या या भूमीकेविरोधात पक्षाची भूमिका निश्चित केले जाणार आहे असे राजन तेली म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे नेते जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले संतोष परब हल्ला प्रकरनात नाहक गोवण्यात आले आहे. भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर चुकीच्या पध्दतीने पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीसांच्या या अन्यकारक भूमीके विरोधात भाजपाचे वरिष्ठ नेते जिल्हा भाजपाच्या ठाम उभे आहेत. केंद्रिय मंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्या़शी आपली चर्चाही झाली असून केद्रिय व राज्यस्तरीय भाजप नेत्यानी आम. नितेश राणे यांच्या पाठीशी ठाम पणे उभे असल्याचे सांगितले आहे असेही अतुल काळसेकर यांनी स्पष्ठ केले.या पत्रकार परिषदेवेळी भाजपाचे प्रसन्न ऊर्फ बाळू देसाई सुहास गवंडळकर चैतन्य चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.