गैरसमज निर्माण करून, आपले वाद चव्हाट्यावर आणून विरोधकांना संधी देऊ नका

गैरसमज निर्माण करून, आपले वाद चव्हाट्यावर आणून विरोधकांना संधी देऊ नका

*कोकण Express*

*गैरसमज निर्माण करून, आपले वाद चव्हाट्यावर आणून विरोधकांना संधी देऊ नका*

*शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय पडते यांचे प्रतिपादन…*

*दोडामार्ग ः लवू परब*

तालुका कार्यकारिणी माजी पदाधिकारी यांची आढावा बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संजय पडते व दोडामार्ग संपर्क प्रमुख श्री धाऊसकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व दोडामार्ग संपर्क प्रमुख धाऊसकर यांनी आढावा घेऊन त्याचा अहवाल तयार करून वरिष्ठ नेत्यांना सादर करणार असून वरिष्ठ पातळीवरून लवकरच नवीन कार्यकारिणी करण्यात येणार आहे असे सांगितले.

संजय पडते यांनी संबोधित करताना सांगितले की शिवसेना ही संघटना असून बाळासाहेबांनी अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. ८० % समाजकारण आणि २०% राजकारण हे या संघटनेचे ब्रिद वाक्य आहे आणि त्यानुसार जो चालतो, त्याला बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणतात. पक्षात राहून वैयक्तिक वादामुळे पक्ष विरोधी काम करणाऱ्यांना शिवसैनिक म्हणून घेण्याचा अधिकार नाही. पक्षाच्या आदेशानुसार जो काम करतो तो खरा शिवसैनिक. एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही. व्यक्ती बघून मतदान करण्यापेक्षा जो भगव्यासाठी एकत्र येऊन शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपले वैयक्तिक वाद, गैरसमज दूर ठेऊन काम करतो त्याला निष्ठावंत शिवसैनिक म्हणतात. वैयक्तिक वादामुळे पक्ष बदनाम करण्याचे काम न करता कोणाचं चूकत असेल तर आपल्या पक्षाचा बैठकीत बोला, वरिष्ठांना त्याची कल्पना द्या, परंतु आपले वाद चव्हाट्यावर आणून विरोधकांना संधी देऊ नका.

अपयशाकडून यश प्राप्ती कडे जायचे असते. परंतु नगरपंचायत निवडणुकीत उलट झाले आणि ते आमच्या व वरिष्ठांच्या जिव्हारी लागले. परिणामी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून प्रत्येकाने याच आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. अपयश आले म्हणून खचून न जाता भविष्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी सर्वांनी मिळून मिसळून एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. पक्ष विरोधी काम करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. तालुका कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवर आहे. लवकरच वरिष्ठ नेते चाचपणी करुन विचार विनिमय करून पदाधिकारी नेमणूक करतील तो पर्यंत सर्वांनी शिवसैनिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!