*कोकण Express*
*भालचंद्र महाराजांचा ११८ जन्मोत्सव सोहळा उत्साहात…*
*जन्मोत्सव भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला…!*
*कनकनगरी गेली भक्तिरसात न्हाऊन…!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
योगी यांचे योगी अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज भालचंद्र महाराज यांचा आज ११८ वा जन्मोत्सव सोहळा याची देही याची डोळा भाविकांनी अनुभवला. हा सोहळा पाहताना दिव्यत्वाची प्रचिती आल्याने भक्तगण हात जोडत बाबांसमोर एकरूप झाले.तुळशी माळांनी तसेच आकर्षक फुलांनी समाधिस्थान सजवण्यात आले होते.
भालचंद्र महाराजांच्या ११८ व्या जन्मदिनी सकाळ पासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.पहाटे समाधी पूजन तसेच समधीस्थळी लगुरुद्र करण्यात आला.त्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली.दुपारी १२ वा.बाबांचा जन्मोत्सव सोहळा सभा मंडपात पार पडला.या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त स्टेजउभारत पाळणा बांधण्यात आला होता.याठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. पाळण्यात बाबांची मूर्ती ठेवत सुहासिनींनी पाळणेगीत गायले.यावेळी भालचंद्र संस्थान परिसरात फटाक्यांची आतषबाजी तसेच सनई तुतारीचा निनाद करत हा जन्मोत्सव सोहळा दिमाखदार पद्धतीत साजरा झाला.तद्नंतर दुपारी नैवद्य दाखवत गाऱ्हाणे घातले.त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत बाबांची सामूहिक आरती करण्यात आली.
आरतीनंतर भाविकांनी रांगेत दर्शन घेत तीर्थ प्रसादाचा लाभ घेतला.तद्नंतर काही बुवांची सुश्राव्य भजने सुरू असून याठिकाणी भक्तिमय वातावरण आहे.सायंकाळी ६ वा. मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत संस्थान परिसरात पालखी प्रदक्षिणा होणार आहे. पालखी प्रदक्षिणेनंतर बाबांची दैनंदिन आरतीने या जन्मोत्सवाची सांगता होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हा जन्मोत्सव सोहळा अत्यन्त साधेपणाने करण्यात आला हा सोहळा भाविकांना घरबसल्या पाहता यावा यासाठी युट्युब व फेसबुक च्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात आला.